"नशीब बलवत्तर म्हणून धोनी बाद..." : गप्टिल

    दिनांक  13-Jul-2019


 


नवी दिल्ली : महेंद्र सिंग धोनीला धावचीत केल्यानंतर न्यूझीलंडच्या क्रिकेट चाहत्यांनी मार्टिन गप्टिलच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले. धोनीची विकेट ही भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये 'टर्निंग पॉईंट' ठरली. याबद्दल एका वृत्तवाहिनीला सांगताना 'नशीब बलवत्तर म्हणूनच धोनीला बाद करण्यासाठी फेकलेला चेंडू थेट स्टंप्सवर जाऊन लागला.' असे गप्टिल सांगतो.

 

"धोनीच्या बॅटला लागून चेंडू हवेत उडाला असल्याचे मला दिसले. तेव्हा मी माझ्या जागेवरुन हललो नाही. मात्र, मी पुन्हा विचार केला की चेंडूवर जावे आणि मी धावत चेंडूवर गेलो. चेंडू हातात येताच मी तो थेट स्टंप्सकडे फेकला. तेव्हा तो चेंडू यष्टीवर आदळला. यामुळे धोनीला परतावे लागले आणि न्यूझीलंडच्या विजयातील मोठा अडसर दूर झाला. शेवटचा महत्त्वाचा गडी बाद करणे हे खूप चांगले असते." असे गुप्टील म्हणाला.

 
 
 

दरम्यान, सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत मार्टिन गुप्टील अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यांच्या बॅटमधून धावा निघत नसल्या तरी तो संघाला आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान देत आहे. भारतीय संघावर विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा सामना विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत यजमान इंग्लंड विरुध्द होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat