बाटला हाऊस नंतर जॉन अब्राहाम आणखी एका ऍक्शन फिल्ममध्ये

13 Jul 2019 13:02:59



जॉन
अब्राहम ला मद्रास कॅफे, परमाणू, सत्यमेव जायते आणि त्याचा आगामी चित्रपट बाटला हाऊस चित्रपटामध्ये एका ऍक्शन हिरोच्या रूपात पाहिले आणि त्याला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती देखील दिली. हेच कारण असावे ज्यामुळे त्याचा 'अटॅक' हा आणखी एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जॉन ने आत्तापर्यंत अनेक धाटणीचे चित्रपट केले मात्र त्यापैकी हा असा जॉनर आहे ज्यामध्ये त्याच्या अभिनयाची कमाल आपण वेळोवेळी अनुभवली आहे.

चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन लक्ष्य राज आनंद यांनी केले असून हा त्यांचा बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून जॉन देखील पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीच्या प्रवाहात उतरणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट सगळ्याच दृष्टीने महत्वाचा ठरेल. हा चित्रपट एका सत्य घटनेवरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेली एक काल्पनिक कथा असून हा चित्रपट डिसेम्बर महिन्यात प्रदर्शित होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0