वडाळा येथील प्रतिपंढरपूर मंदिरात विनोद तावडेंची विधीवत पूजा

    दिनांक  12-Jul-2019 


वडाळा : महाराष्ट्राचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे वडाळा येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिम्मित आज मोठा उत्साह दिसून येत आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पहाटे सपत्नीक या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईची विधीवत महाअभिषेक व पूजा केली.


महाअभिषेक व पूजेनंतर विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी साकडे घातले. विठूरायाच्या चरणी विलीन होताना एक वेगळे समाधान मिळत असल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात विठुरायाकडे जे साकडे घातले तेच साकडे आपण विठुरायाकडे घातले असल्याचे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat