दहशतवाद्यांच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही - परराष्ट्र मंत्रालय

12 Jul 2019 11:58:51

 

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणामुळे दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे. त्याचाच परिणाम म्हणून 'अल कायदा' या दहशतवादी संघटनेने भारताला धमकी देणारा व्हिडीओ प्रसारित केला. भारताने यापूर्वीही अशा धमक्या ऐकल्या असून अशा धमक्यांना भारत भीक घालत नसल्याचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या 'डोण्ट फरगॉट काश्मीर' धमकीला घाबरून नका. अशा धमक्यांना व दहशतवादी संघटना प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर खंबीर असल्याचे रवीश कुमार म्हणाले. काही दिवसांपूर्वी अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या मोहरक्या आयवान-अल-मुजाहिरीने भारतीय लष्कराला धमकी देणारा व्हिडीओ प्रसारित केला होता.

 

'डोन्ट फॉरगेट काश्मीर' या आशयाचा हा व्हिडीओ १४ मिनिटांचा होता. यात भारतीय लष्कराला लक्ष करा असा आदेश मुजाहिरीने दहशतवादी संघटनांना दिला होता. तसेच वारंवार हल्ले करून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणार असल्याचेही त्याने म्हटले होते. यावर बोलताना रवीश कुमार म्हणाले, "भारताची एकता व शातंता कोणीही भंग करू शकत नाही. दहशतवाद्यांना जशाच जसे उत्तर दिले जाईल."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0