'क्षितिज' फिल्म क्लब आजपासून चित्रपट विभागामध्ये सुरु होणार

12 Jul 2019 11:00:12



१९४८
साली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपट विभागाची स्थापना केली होती. या विभागातर्फे अनेक दुर्मिळ माहितीपटांचे जतन करण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून एक नवीन उपक्रम सुरु करण्यात येत असून 'क्षितिज' माहितीपट संस्थेतर्फे चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहेया उपक्रमाचा आज शुभारंभ होणार असून आजच्या प्रक्षेपणामध्ये अजय आणि विजय बेदी दिग्दर्शित ' सिक्रेट लाईफ ऑफ फ्रॉग' या माहितीपटाचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.



दर महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी संध्याकाळी माहितीपटांचे प्रक्षेपण मुंबईतील चित्रपट विभागामध्ये करण्यात येणार असून संध्याकाळी ते :३० च्या दरम्यान हा कार्यक्रम संपन्न होईल. 'क्षितिज' या फिल्म क्लब अंतर्गत यावेळी माहितीपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावलेल्या लोकांशी प्रेक्षकांना संवाद साधण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिली आहे.


दरम्यान, 'क्षितिज' या फिल्म क्लबच्या अनावरणाचा सोहळा देखील आज संपन्न होणार असून शहरी विकास राज्यमंत्री योगेश सागर, प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या अरुणराज पाटील आणि मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते उपक्रमाचे उदघाटन संध्याकाळी वाजता ऑडी -, न्यू म्युझियम बिल्डिंग, फिल्म डिव्हिजन कॉम्प्लेक्स, मुंबई येथे करण्यात येणार आहे.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0