आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये बैलांच्या झुंजीत विद्यार्थी जखमी

12 Jul 2019 19:04:47

 

मुंबई : आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये दोन बैलांच्या झुंजीत विद्यार्थ्याला उडविल्याचे समोर आले आहे. काल सकाळी मुलांच्या वसतिगृहाजवळ ही घटना घडली असून बैलांची धडक बसल्याने विद्यार्थी जखमी झाला आहे. जखमी विद्यार्थ्याला इतर विद्यार्थी आणि स्टाफने विक्रोळी येथील शुश्रूषा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृत्ती स्थिर आहे.
 
 
 
पवई येथील आयआयटी गेट नंबर ९ समोर आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी गेटच्या बाजूला उभा राहून आपल्या मोबईलमध्ये बघत होता. अचानक त्याच्या दिशेने धावत आलेल्या बैलांची त्याला धडक बसली आणि या धडकेमध्ये तो जखमी झाला. या दोन बैलांच्या झुंजीचा फटका या विद्यार्थ्याला बसला आहे. ही संपूर्ण घटना मुंबई आयआयटी वसतिगृहाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
 
Powered By Sangraha 9.0