भारताच्या पराभवानंतर पाकड्यांचा 'जल्लोष'

    दिनांक  11-Jul-2019


 


मुंबई : उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने भारताचा अवघ्या १८ धावांनी पराभव केला. भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये जल्लोष करण्यात आला. पाकिस्तानच्या नागरिकांपासून ते महत्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांनी न्यूझीलंडच्या विजयाचा व भारताच्या पराभवाचा जल्लोष पाहायला मिळाला.


विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा केलेला दारुण पराभव तेथील नागरिकांना अद्याप पचनी पडलेला दिसत नाही. कारण याच पाकी समर्थकांनी उपांत्य सामन्यातील भारताच्या पराभवानंतर अक्षरशः नंगानाच केल्याचे पाहायला मिळाले. ट्विटरवर भारताच्या पराभवाची खिल्ली उडवणारे मिम्स ट्विट करण्यात आले.


भारताचा विंग कमांडर अभिनंदनच्या फोटोचा वापर करत अभिनंदनाच्या जागी विराट कोहलीला दाखवणारे एक मिम्स वायरल झाले आहे. यात पाकिस्तानी सैनिकांच्या वेशात न्यूझीलंडच्या खेळाडूंना दाखवण्यात आले. एवढं नाहीतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला पाकिस्तान क्रिकेट संघाच्या जर्सीत दाखवणारे मिम्स शेअर करत भारताचा बदला घेतला असल्याचे दाखवण्यात आले.


पाकिस्तानी नागरिकांच्या पुढे जाऊन पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर यांनी ट्विट करत न्यूझीलंडचे अभिनंदन केले. नैतिक मूल्यांच्या आधारे चालणाऱ्या महान देशाच्या या क्रिकेट संघाने खिलाडूवृत्ती दाखवत विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रवेश केला असल्याचे गफूर म्हणाले. यावेळी त्यांनी भारतचे नाव न घेता खेळ खेळताना नैतिक मूल्यांची गरज असल्याची गरळ ओकली.


भारताच्या पराभवानंतर करण्यात आलेल्या मिम्सवरून पाकड्यांची जळकुटी मानसिकता दिसून येत असून भारतीय संघाचे समर्थक त्यांना जशाच तसे उत्तर देत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat