रंगशारदामध्‍ये रंगणार "आषाढरंग मैफल"

    दिनांक  11-Jul-2019
राज्‍याचे शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांचा उपक्रम


मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवार, १२ जुलै रोजी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात संध्‍याकाळी साडेसहा वाजता प्रसिध्‍द गायकांच्‍या आवाजात विठ्ठल नामाची मैफल अर्थात आषाढरंगया कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. राज्‍याचे शालेय शिक्षण, क्रिडा व युवक कल्‍याण मंत्री आणि मुंबई भाजपचे अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 

दरवर्षी आषाढी एकादशी निमित्‍ताने आपल्‍या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात अॅड. आशिष शेलार भक्‍तीगितांची मैफिल आयोजित करून भक्‍तीमय सुरांच्‍या वातावरणात आषाढी साजरी करतात. यावर्षी हा कार्यक्रम रंगशारदा सभागृहात संध्‍याकाळी साडेसहा वाजता होणार आहे. प्रसिध्‍द गायक अनिरूध्‍द जोशी, सुवर्णा माटेगावकर, सोनाली कर्णिक आणि संजीव चिम्‍मलगी यांच्‍या आवाजात विठ्ठूमाऊलीच्‍या अभंगाची ही मैफल सजणार असून स्मिता गवाणकर निवेदन करणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat