सावधान ! अडीच कोटी मोबाईल फोन्सवर व्हायरस हल्ला

    दिनांक  11-Jul-2019
 

कसा होतो मालवेअर हल्ला वाचा सविस्तरनवी दिल्ली : तुम्ही अॅण्ड्रॉईड फोन वापरत असाल, तर सावध व्हा. भारतासह अनेक देशांतील अडीच कोटी युझर्सच्या मोबाईलवर मालवेअर हल्ला झाल्याची बाब नुकतिच उघड झाली आहे. इस्रायली सायबर सिक्योरिटी रिसर्च कंपनीतील चेक पॉइंटद्वारे ही माहीती देण्यात आली आहे. हा घातक व्हायरस भारतासारख्या विकसनशील देशांवर हल्ला करत आहे.

 

विकसनशीसल देशांतील मोबाईल युझर्सच्या डेटावर हल्ला करून व्हॉटस्अपही हॅक केले जात आहे. त्याऐवजी बनावट व्हर्जन इन्स्टॉल करून डाटा चोरीसारखे प्रकार घडत आहेत. हॅकर्स व्हायरसच्या मदतीने युझर्स पर्सनर डेटा चोरी करू शकतात. चेक पॉइंटने दिलेल्या माहीतीनुसार, 'एजंट स्मिथ' नावाचा हा मालवेअर डिव्हाइसला सहजरित्या अॅक्सेस करू शकतो.

 

असा होतो डेटा हॅक

मोबाईलधारकाला इंटरनेट ब्राऊझरवर पैशांबद्दलच्या आकर्षक जाहीराती दाखवल्या जातात. त्यानंतर त्यावर क्लिक केल्यावर युझरची बॅंकेची डिटेल्स चोरी केली जाते. हा मालवेअर Gooligan, Hummingbad आणि CopyCat शी मिळता-जुळता आहे.


भारताच्या . कोटी युझर्सवर व्हायरसचा हल्ला

फोर्ब्सने दिलेल्या माहीतीच्या आधारे, भारतातील . कोटी अॅण्ड्रॉईड स्मार्टफोन्सवर या व्हायरसचा हल्ला झाला आहे. अमेरिकेत लाख आणि इंग्लंडमध्ये लाख ३७ हजार अॅण्ड्रॉईड स्मार्टफोन्सवर या व्हायरसचा हल्ला झाला आहे. 9apps.com या अॅपकडून फोनमध्ये आल्याचेही यात सांगण्यात आले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर भारतासह अन्य देशांतील स्मार्टफोन्स युझर्सला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

अशी चोरी होते खासगी माहीती

हा मालवेअर एक व्हायरसप्रमाणे काम करणारे सॉफ्टवेअर असून तो मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतो. युझरची माहीती चोरी करतो. हा व्हायरस इंटरनेट किंवा एखाद्या अॅप्लीकेशनच्या सहाय्याने कॉम्प्युटर, मोबाइलमध्ये प्रवेश करून महत्वाची माहीती चोरी करू शकतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat