उमेश कामत आणि प्रिया बापट एकत्र काम करणार...'आणि काय हवं?'

11 Jul 2019 17:14:28




उमेश कामत आणि प्रिया बापट यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना आत्तापर्यंत अनेकदा ऑफस्क्रीन पाहायला मिळाली मात्र आता मोबाईल स्क्रीनवर म्हणजेच डिजिटल माध्यमातून हे दोघे एका वेब सिरीजमध्ये एकत्र काम करणार आहेत. 'आणि काय हवं?' असे या सीरिजचे नाव.  
या सिरीजची कथा ६ भागांमध्ये MX PLAYER या डिजिटल माध्यमावर उलगडणार आहे.


"७ वर्ष वाट पहावी लागली ह्या अभिनेत्री सोबत काम करायला.....तेवढीच वर्ष लागली अनिश जोग आणि रणजित गुगळे ह्याच्या सोबत काम करायला. हा योग जुळवून आणला मुरांब्या सारख्या गोड वरुण नार्वेकर ने" अशी पोस्ट उमेश कामतने सोशल मीडियावर शेअर केली आणि ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली. 



प्रिया बापटने या आधी 'सिटी ऑफ ड्रीम' या वेब सिरीजमधून डिजिटल माध्यमामध्ये पदार्पण केले आहे मात्र उमेश पहिल्यांदाच या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यात उमेश आणि प्रिया यांना एकत्र काम करताना बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असेलच यात शंका नाही.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0