'द लायन किंग' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

    दिनांक  11-Jul-2019
लहानपणी
टेलिव्हिजनवर पाहिलेला सिम्बा आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. किंग खान बरोबरच त्याचा मुलगा आर्यन खानची पाऊले देखील आता चित्रपटांकडे वळताना दिसत आहेत. हिंदी मधील ' लायन किंग' या चित्रपटाला शाहरुख खान आणि आर्यन यांनी डबिंग केले आहे. यामध्ये सिम्बा ला आर्यन ने आवाज दिला आहे. याच हिंदी चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. लायन किंग हा चित्रपट येत्या १९ जुलैला प्रदर्शित होणार असून प्रेक्षक त्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.


हिंदी बरोबरच इंग्रजी, तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये देखील चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आफ्रिकेतील जंगलाचा राजा कोण होणार याची ही लढाई, यामध्ये मुफासा या जंगलाच्या राजाचा नुकताच जन्मलेला छावा म्हणजे सिम्बा; त्याच्यावर आता या साम्राज्याची जबाबदारी द्यावी अशी मुसाफाची इच्छा आहे. मात्र सत्तेवर स्कार या मुसाफच्या भावाचा डोळा आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रवास आपण या चित्रपटात पाहणार आहोत. लायन किंग या चित्रपटाला हॅन्स झिमर यांचे संगीत चित्रपटाला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाईल यात तर शंका नाहीच मात्र चित्रपटातील ऍनिमेश देखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल असे या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat