'सांड की आख' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

    दिनांक  11-Jul-2019
तुषार हिरानंदानी दिग्दर्शित 'सांड की आख' चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित झाला. तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर या चित्रपटात बागपत येथील प्रकाशी तोमर आणि चंद्रो तोमर या दोन नेमबाजीत तरबेज असलेल्या वयस्कर महिलांच्या सत्य कथेवर आधारलेल्या या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत.


या टीजरमधून त्यांच्या घरच्यांचा त्यांच्या शुटिंगविषयी असलेल्या प्रेमाला असलेला विरोध दिसून येतो. मात्र या सगळ्या परिस्थतींवर मात करत त्यांचा मेडल जिंकण्यापर्यंतचा प्रवास आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. साधारणतः ऑक्टोबरमध्ये म्हणजे दिवाळीच्या कालावधीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान अक्षय कुमारचा हाऊसफुल देखील तेव्हाच प्रदर्शित होणारे त्यामुळे आता या दोन चित्रपटांमधील बॉक्स ऑफिसवरची स्पर्धा बघणे औत्सुक्याचे ठरेल.माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat