धोनीच्या निवृत्तीविषयी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर झाल्या भावूक

    दिनांक  11-Jul-2019


भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर चाहते आधीच दुःखात होते त्यात सर्वांच्या लाडक्या महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा होत असल्यामुळे तर अनेकांना अश्रू अनावर झाले. या पार्श्वभूमीवर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या देखील भावूक झाल्या आहेत. त्यांनी धोनीला ट्विटरच्या माध्यमातून निवृत्त न होण्याची विनंती केली. "भारतीय क्रिकेट संघाला तुझी गरज आहे" असे म्हणत त्यांनी माहिचे मन वळवण्याचा एक प्रयत्न केला आहे.

त्याचबरोबर भारतीय संघाच्या पराभवामुळे क्रिकेटचे चाहते निराश झाले आहेत. त्यावर देखील लता दीदींनी आपला भारतीय क्रिकेट संघाला आपला कायमच पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. आणि टीमचे मनोधैर्य वाढावे यासाठी एक गाणे देखील त्यांना डेडिकेट केले आहे. भारतीयांचे क्रिकेट ये खेळाशी असलेले भावनिक नाते यावरून जाणवते. आता लता दीदींच्या तसेच देशवासीयांच्या विनंतीचा मान ठेऊन धोनी निवृत्तीविषयी काय निर्णय घेतो हे पाहणे खूपच औत्सुक्याचे ठरणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat