बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर विचार आजच

    दिनांक  11-Jul-2019

 
 
 
नवी दिल्ली : कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर लवकरात लवकर तोडगा निघावा याकरिता सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महत्वपूर्ण निर्णय दिला. कर्नाटक विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर आजच निर्णय द्यावा अशी सूचना केली आहे. याबरोबरच या बंडखोर आमदारांना सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, असेही आदेश दिले. सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशानंतर सर्वच १६ बंडखोर आमदार सायंकाळी ६ वाजता विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार आहे.
 
 
काँग्रेस-जेडीएसच्या १४ आमदारांच्या राजीनाम्यांनंतर एम. टी. बी नागराज आणि के. सुधाकर यांनी राजीनामे दिले. यानंतर राजीनामा दिलेल्या आमदारांची संख्या १६वर पोहोचली आहे. यामुळे विधानसभा सदस्यांची संख्या ११८ वरून घटून ती १०० वर आली आहे. राज्यातील सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस-जेडीएसला १०५ या जादुई आकड्याची गरज आहे. दरम्यान, काँग्रेस नेते शिवकुमार यांनी मुंबईत दाखल होत बंडखोर आमदारांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांची भेट होऊ दिली नाही.
 
आत्तापर्यंत मी कोणत्याही आमदाराचा राजीनामा स्वीकारला नसून, मी एका रात्रीत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. तसेच सर्व आमदारांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकल्यावरच निर्णय होईल",असे काल विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार म्हणाले. यामुळे विधासभा अध्यक्ष वेळकाढूपना करत असल्याची टीका देखील काही बंडखोर आमदारांनी केली होती. यानंतर कर्नाटकातील पेचप्रसंग अधिकच वाढला. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाने ही परिस्थितीत बदलली. विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाची प्रत जमा झाल्यावरच शुक्रवारी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होईल.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा  twitter.com/MTarunBharat