‘रामायण सर्किट थीम’ योजना; देशातील पंधरा स्थळांचा विकास होणार

    दिनांक  11-Jul-2019
नवी दिल्ली : स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत केंद्र सरकारने रामायण सर्किट थीमतयार केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील नाशिक व नागपूरसह अन्य नऊ राज्यांमधील १५ स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. रामायणात उल्लेख असलेल्या ठिकाणांचा यामध्ये समावेश करुन त्यांच्या विकासाद्वारे देशांतर्गत पर्यटन वाढीचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती पर्यटनमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी राज्यसभेत दिली.

 

उत्तर प्रदेशातील अयोध्या, नंदीग्राम, शृंगवेरपूर आणि चित्रकूट, बिहारमधील सीतामढी, बस्कर आणि दरभंगा, मध्य प्रदेशातील चित्रकूट, ओडिशातील महेंद्रगिरी, छत्तीसगडमधील जगदलपूर, महाराष्ट्रातील नाशिक आणि नागपूर, तेलंगणातील भद्राचलम, कर्नाटकातील हम्पी आणि तामिळनाडूमधील रामेश्वरम या स्थळांचा रामायण परिपथ थीमअंतर्गत विकास करण्यात येणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली. एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना ते बोलत होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat