पालघर किनाऱ्यावर मृत व्हेल

    दिनांक  10-Jul-2019
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील माहिम समुद्र किनाऱ्यावर बुधवारी सकाळी मृत व्हेलचे शरीर आढळले. हे शरीर मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत आहे. स्थानिकांनी संबंधित माहिती वन विभागाला कळवली असून विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

 
 
 

पावसाळ्यात जोरदार लाटांच्या तडाख्यामुळे जखमी किंवा अशक्त सागरी जीव किनाऱ्यावर वाहून येतात. यामध्ये सागरी कासवांबरोबरच डाॅल्फिन, व्हेल व पाॅयपाॅईज या सागरी सस्तन प्राण्यांचा समावेश आहे. मुंबई आणि त्याच्या आसपासच्या किनाऱ्यावर दरवर्षी हे जीव मोठ्या संख्येने वाहून येतात. यामधील बरेच सागरी सस्तन प्राणी मृतावस्थेत असतात. पालघरच्या माहिम किनाऱ्यावर बुधवारी सकाळी मृत व्हेलचे शरीर वाहून आल्याचे आढळून आले. हे शरीर कुजलेले असल्याने किनाऱ्यावर दुर्गंधी पसरली आहे. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. व्हेलचे शरीर कुजलेले असल्याने त्याच्या प्रजातीबाबत ओळख पटविणे मुश्किल झाले आहे.

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat