नितेश राणेंना सशर्त जामीन मंजूर

    दिनांक  10-Jul-2019

 
 
कुडाळ : नितेश राणे व त्यांच्या १८ समर्थकांना आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी नितेश राणे न्यायालयीन कोठडीत होते.
 
 

नितेश राणे यांना २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून दर रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, अशी अट घालण्यात आली आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर नितेश राणेंनी चिखल ओतले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नितेश व त्यांच्या १८ समर्थकांना अटक केली होती. या सर्वांना आज सशर्त जामीन मंजूर झाला आहे.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat