BEST च्या निर्णयाला जितूराज म्हणतो 'बेस्ट'

    दिनांक  10-Jul-2019
 


मुंबईकरांचा
जवळ जवळ अर्धा दिवस प्रवासात जातो असे म्हणायला हरकत नाही. मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीविषयी नेहेमीच चाकरमान्यांकडून कौतुक केले जाते आता असेच कौतुक करण्यासारखी आणखी एक गोष्ट घडली आहे. बेस्ट आणि ट्रेन ही मुंबईची जणू काही लाइफलाईनच. अशातच मुंबई महानगरपालिकेने 'बेस्ट' च्या तिकिटाचे दर कमी केल्याने प्रवाशांचा आनंद गगनात मावेनासा झालाय आणि आर.जे. जितूराजचा देखील; "आज भी, #आपलीमुंबई मे कुछ पैसे भी बचा पाएं तो खुशी होती है। इसका सबूत ये BEST का टिकट है।" असे म्हणत त्याने सोशल मीडियावर या निर्णयाचे स्वागत करत आपला आनंद व्यक्त केला आहे. जितूराज बरोबरच सामान्य नागरिकांनी देखील या निर्णयाचे कौतुक केले आहे.
 

आत्तापर्यंत बेस्टचे किमान भाडे रुपये होते ते आता कमी करून रुपये करण्यात आले. त्याचबरोबर बेस्टच्या अन्य टप्प्यांच्या भांड्यांमध्ये देखील काही काळाने घट होण्याची शक्यता आहे. बेस्टच्या भाडे कपातीचा निर्णय काल राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केला. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आजपासून स्वस्त होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat