'पहलवान' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

    दिनांक  10-Jul-2019एस कृष्णा दिग्दर्शित 'पहलवान' या चित्रपटाच्या प्रसारणाची जबाबदारी झी स्टुडिओज सांभाळणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर चित्रपटाचे एक नवीन पोस्टर देखील आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका साकारणारा सुदीप किच्चा रिंगणातील एका पैलवानाच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे अर्थातच हा एक कुस्तीशी निगडित चित्रपट आहे हे उघड होते.'पहलवान' हा चित्रपट हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू आणि मल्याळम या बहुभाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान भारताबरोबरच नेपाळ आणि भूतानमध्ये असे मिळून जगभरात एकूण २५०० स्क्रीनवर चित्रपटाचे प्रदर्शन होणारे. आणि अशा तर्हेने कन्नड चित्रपट सृष्टीतील हा सर्वात मोठा चित्रपट ठरेल असा अंदाज व्यक्त होत आहे. 'पहलवान' मध्ये सुदीप किच्चा बरोबर आकांक्षा सिंह आणि सुनील शेट्टी देखील महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat