भारत विश्वचषकाबाहेर : धोनी, जडेजाची एकेरी झुंज अपयशी

    दिनांक  10-Jul-2019मँचेस्टर : न्युझीलंडच्या भेदक गोलंदाजीच्या सहाय्याने केन विल्यमसनच्या संघाने विश्वचषक २०१९ मध्ये अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अखेरच्या षटकापर्यंत सुरू असलेल्या उत्कंठावर्धक खेळात न्युझीलंडने भारतावर १८ धावांनी मात केली. न्युझीलंडने केलेल्या २४० धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ कोलमडून पडला. भारताने सर्वबाद २२१ धावा केल्या. अखेरच्या षटकापर्यंत झुंज देण्यात भारतीय संघ अपयशी ठरला नाही.

 

रविंद्र जाडेजाने ७७ तर धोनीने ५० धावा केल्या. या पराभवासह भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्ठात आले. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्रीने ३, मिचेल सँटनरने-ट्रेंट बोल्टने २-२ तर फर्ग्युसन आणि निशमने १-१ बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला. पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने अखेरीस २३९ धावा केल्या होत्या. बुधवारी न्युझीलंडला केवळ २८ धावा करता आल्या.

 

बुधवारी दिवसाच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे भारतीय फलंदाज हे आव्हान कसे पूर्ण करतात हे पहावे लागणार आहे. न्यूझीलंडकडून अनुभवी टॉम लॅथमने ७४ धावांची खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ३ बळी घेतले. त्याला अन्य गोलंदाजांनी १-१ बळी घेत चांगली साथ दिली. भारतातर्फे रविंद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनीची एकेरी झुंज अपयशी ठरल्याने अखेर आता विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat