'बाटला हाऊस' चा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक  10-Jul-2019२००८
साली झालेल्या बाटला हाऊस येथे झालेल्या एन्काउंटरवर आधारित 'बाटला हाऊस' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. 'बाटला हाऊस' या चित्रपटात जॉन अब्राहम संजीव कुमार यादव या पोलीस कर्मचाऱ्यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. या ट्रेलरमध्ये चित्रपटातील काही चित्तथराक सिनची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बाटला हाऊस या ठिकाणी झालेल्या एन्काउंटर विषयी देशात अनेक पूर्वग्रह बनवण्यात आले होते का? याचे उत्तर आता लवकरच मिळेल अशा आशयाची पोस्ट जॉन ने ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करताना लिहिली आहे.


निखिल अडवाणी दिग्दर्शित 'बाटला हाऊस' चित्रपटात जॉन अब्राहाम बरोबर मृणाल ठाकूर, रवीकिशन, प्रकाश राज, क्रांती प्रकाश झा हे देखील चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची पटकथा रितेश शाह यांनी लिहिली आहे. साहो, मिशन मंगल या चित्रपटांच्या बरोबरीनेच 'बाटला हाऊस' देखील १५ ऑगस्टलाच प्रदर्शित होणार असल्यामुळे आता प्रेक्षकांचा कल कोणत्या चित्रपटाकडे वळतो हे पाहणे महत्वाचे असेल. तर या पार्श्वभूमीचा बॉक्स ऑफिसवरील परिणाम हा खूप महत्वाचा ठरेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat