रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी विश्वनाथन यांची पुनर्नियुक्ती

01 Jul 2019 16:55:02


 


नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नरपदी एन. एस. विश्वनाथन यांची नियुक्ती करण्यात आली. आरबीआयचे यापूर्वीचे चौथे डेप्यूटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर विश्वनाथन यांची निवड झाली. विश्वनाथन यांची डेप्यूटी गव्हर्नरपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून यापूर्वी त्यांची २०१६ साली त्यांची तीन वर्षासाठी निवड झाली होती. त्यांचा हा तीन वर्षाचा कार्यकाळ येत्या ३ जुलै रोजी संपणार असून विश्वनाथन यांचा आणखी एका वर्षाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. ४ जुलै पासून ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.

 

रिझर्व्ह बँकेचे एकुण चार डेप्युटी गव्हर्नर्स असतात. यापैकी विरल आचार्य यांनी वैयक्तिक कारणास्तव सहा महिन्या अगोदरच राजीनामा दिल्याने डेप्यूटी गव्हर्नरपदी सध्या एन एस. विश्वनाथन, बी. पी. कानूनगो आणि एम. के. जैन असे तीनच जण आहेत. यात विश्वनाथन यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांचा कार्यकाळ आणखी एका वर्षाने वाढवण्यात आला आहे. विश्वनाथन यांनी अर्थशास्रात पदव्युत्तर पदवी मिळवली असून अनेक महत्वाच्या पदावर काम केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0