धक्कादायक : आता 'हा' भारतीय खेळाडू विश्वचषकाबाहेर

    दिनांक  01-Jul-2019बर्मिंगहॅम : दुखापतीमुळे विश्वचषकामधून बाहेर पडणाऱ्यांची यादीत आणखी एक नाव शामिल झाले आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याला सार्वमध्ये दुखापत झाल्याने विश्वचषकामधून बाहेर पडावे लागणार आहे. यामुळे सलामीवीर शिखर धवन आणि मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वरकुमार यांच्यानंतर विजय शंकरच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला आहे. बीसीसीआयने आयसीसीकडे शंकरच्या जागी मयांक अग्रवालला संधी देण्यासाठी केली औपचारिक विनंती आहे.

 
 
 

सरावादरम्यान विजय शंकरच्या पायाला दुखापत झाली होती. जसप्रीत बुमराचा यॉर्कर विजय शंकरच्या पायावर आदळला आणि त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मागील सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला होता. डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे विजय शंकरला त्यातून सावरण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. परिणामी त्याला संघातून वगळण्यात येत असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

 

सलामीवीर मयांक अग्रवालला संधी मिळण्याची शक्यता

 

कर्नाटक संघाचा सलामीवीर २८ वर्षीय मयांक अगरवालने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र तो अद्याप एकदिवसीय सामन्यात खेळलेला नाही. सलामीवीर असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन मयांक अगरवालचा संघामध्ये समावेश करु शकतात. कर्नाटक कडून क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूने आतापर्यंत एकूण ७५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४८. ७१ च्या सरासरीने ३६०५ धावा केल्या आहेत. तसेच रिषभ पंत पुढच्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरल्यास के एल राहुलला चौथ्या क्रमाकांवर संधी दिली जाऊ शकते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat