महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी...

    दिनांक  09-Jun-2019मुंबई : महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मान्सूनपूर्व सरींनी सातारा, औरंगाबादमध्ये हजेरी लावली आहे. वाई, महाबळेश्वर परिसरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली, तर महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साठले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक धिम्यागतीने चालत आहे.

 

दुसरीकडे, औरंगाबादमध्ये काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर ग्रामीणभागात सोसाट्याचा वारा सुटल्याने ढगाळ वातावरण तयार झाले आहे. संगमनेर तालुक्यामध्येदेखील जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या जनतेने सुटकेचा श्वास सोडला आहे. राज्यात आलेल्या सरींनी बळीराजाची सुखावला आहे.

 

मुंबईमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर दूर राहील, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने समुद्र किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सुरक्षेसाठी मासेमारांनी ११ आणि १२ जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागानेही केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat