'त्या' बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्याला ५ लाखांची घोषणा

    दिनांक  09-Jun-2019


 


नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे बेपत्ता असलेल्या एएन-३२ विमानाची माहिती देणाऱ्याला ५ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे विमान बेपत्ता होऊन ६ दिवस झाले आहे.यामध्ये ८ क्रू मेंबर आणि ५ प्रवाशांसह एकूण १३ जणांचा समावेश आहे.

 

जोरहाट इथून या विमानाने दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण केले. मेंचुका अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर या विमानाचे लँडिंग होणे अपेक्षित होते. पण उड्डाणानंतर अर्ध्या तासात या विमानाचा जमिनीशी संपर्क तुटला होता. हे विमान शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व मोहिमा अपयशी ठरल्या आहे. त्यामुळे हवाई दलाने हा निर्णय घेतला आहे. खराब हवामान असूनही या अपघाताच्या ६ व्या दिवशीही शोधमोहीम सुरूच होती. मात्र, विमानाचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे आता या विमानाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला ५ लाखांचे बक्षिस देणार असल्याची घोषणा हवाई दलातर्फे करण्यात आली आहे, अशी माहिती कमांडिंग इन चीफ एअर मार्शल आर. डी. माथुर यांनी दिली.

 

विमानाची विश्वसनीय माहिती देणाऱ्या व्यक्तीला किंवा संघटनेला ५ लाखांचे बक्षिस देण्यात येईल. यासाठी हवाई दलाने संपर्क साधण्यासाठी ९४३६४९९४७७, ९४०२०७७२६७, ९४०२१३२४७७ या क्रमांकवर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat