'आर्टिकल १५' मधील रॅप सॉंगचा टीजर प्रदर्शित

    दिनांक  08-Jun-2019

 
 

भारताच्या संविधानामधील एका कलमावर आधारित आर्टिकल १५ या चित्रपटामधील नवीन रॅप गाण्याचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. 'शुरु करें क्या?' असे या गाण्याचे बोल असून हे एक रॅप सॉंग आहे ज्यामध्ये समाजामध्ये होणाऱ्या अत्याचारांवर भाष्य केल्याचे दिसून येत आहे. हे गाणे एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. संपूर्ण गाणे १० जून ला प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे चित्रपटातील मुख्य अभिनेता आयुष्मान खुराना याने जाहीर केले आहे.

 

अभिनव सिन्हा दिग्दर्शित 'आर्टिकल १५हा चित्रपट एका रहस्यमय हत्येचे गूढ उलगडणार आहे. आता ही हत्या का झाली? कोणी केली हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र या चित्रपटात अत्याचार आणि भेदभावाविरुद्ध या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.

आयुष्मान या चित्रपटात एका पोलीस कर्मचाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या रहस्यमय चित्रपटातील कथा त्याचीच भूमिका उलगडणार आहे. हा चित्रपट येत्या २८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat