पंतप्रधान मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर

    दिनांक  08-Jun-2019


 

नवी दिल्ली : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मालदीव दौऱ्यावर रवाना झाले आहेत. याआधीच एक महत्वपूर्ण माहिती समोर येत असून पंतप्रधान मोदींना मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. निशान इजुद्दीनअसे मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव आहे.

 

भारत आणि मालदीव या दोन्ही देशाचे संबंध सुधारण्यासाठी मोदींनी प्रयन्त केले असून याचमुळे मालदीवचे राष्ट्रपति इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी हा पुरस्कार जाहीर केल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले. मालदीव पोहचल्यानंतर सायंकाळी राष्ट्रपती भवनात एका विशेष कार्यक्रमात मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान मोदी हे मालदीवच्या संसदेला संबोधित करणार आहेत. यासाठी मालदीवच्या संसदेत एक विशेष ठरावही मंजूर करण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat