शिक्षक असूनही 'सुपर ३०' कडून खूप शिकलो - हृतिक रोशन

    दिनांक  08-Jun-2019


हृतिक रोशन मुख्य भूमिकेत असलेल्या 'सुपर ३०' या चित्रपटामधील सुपर ३० नेमके कोण आहेत हे आज अखेर प्रेक्षकांसमोर आले आहे. हृतिक रोशनने चित्रपटातील या टीमचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मी या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारत असलो तरी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मी विद्यार्थी अवस्थेतच असल्याचे मत त्यांनी आज व्यक्त केले. या चित्रपटातील सुपर ३० विद्यार्थ्यांची तपस्या, उत्साह आणि चिकाटी यातून खूप काही शिकायला मिळाले असे देखील त्यांनी त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सुपर ३० हा चित्रपट आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आय आय टी सारख्या एखाद्या खर्चिक आणि कठीण अभ्यासक्रमासाठी तयारी करणे हे एक दिव्य समजले जाते. आणि अशातच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असताना या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे हे त्याही पेक्षा अवघड, मात्र आनंद कुमार यांनी एक नाही तर अशा कित्येक विद्यार्थ्यांना स्वतःकडे असलेले ज्ञान आणि मार्गदर्शन करून ही परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत केली. या सगळ्या संघर्षात त्यांना अनेक अडचणी आल्या मात्र त्यावर मात करून त्यांनी इथपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पार केला.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat