आम्ही सत्तेसाठी नाही तर देशाला घडविण्यासाठी राजकारणात : पंतप्रधान मोदी

    दिनांक  08-Jun-2019


 


"माझ्यासाठी केरळ आणि वाराणसी हे दोन्हीही सारखेच"


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि एनडीएला केरळमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. तरीही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानात सहभागी झाल्याबद्दल केरळवासीयांचे आभार मानले. "भाजपचे कार्यकर्ते केवळ निवडणुकीपुरते मैदानात राहत नाहीत. तर ते ३६५ दिवस जनतेच्या सेवेसाठी कटीबद्ध असतात. आम्ही या ठिकाणी केवळ सरकार बनवण्यासाठी आलो नाहीत तर देशाला घडवण्यासाठी आलो आहोत." असे त्यावेळी जनतेला संबोधित करताना सांगितले.

 
 
 

दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा केरळचा हा पहिला दौरा आहे. त्यानंतर ते मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. केरळच्या प्रसिद्ध गुरुवायूर मंदिरात दर्शन घेतले.तसेच, कमळांच्‍या फुलांपासून तुला देखील केली. भाजपा कार्यकर्त्यांकडून आयोजित अभिनव सभेमध्ये मोदींनी केरळवासीयांचे आभार मानले. "जनता जनार्दन देवाचे रूप आहे. या निवडणुकीत लोकांनी ते अनुभवले आहे. राजकीय पक्षांना याचा अंदाज आला नाही. परंतु, भाजप व एनडीएच्या पारड्यात लोकांनी भरभरून मतदान करून भाजपला विजयी केले. म्हणून मी या जनतेपुढे नतमस्तक होवून त्यांचे आभार मानतो आहे." असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 
 
 

केरळ आणि वाराणसी माझ्यासाठी सारखेच : पंतप्रधान

 

लोकसभा निवडणुकीत भाजपला केरळमध्ये खातेही उघडता आले नव्हते. तरीही नरेंद्र मोदी केरळमध्ये लोकांचे आभार मानायला का गेले आहेत?, असा प्रश्न राजकीय पंडितांना पडला. परंतु, 'वाराणासीवर माझे जितके प्रेम आहे, तितकेच ते केरळवर आहे,' अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळवासीयांचे आभार मानले आहेत. 'ज्या लोकांनी विजयी केले ते आमचे आहेत व जे लोक यावेळी चुकलेत तेही आमचेच आहेत,' असेही मोदी यावेळी म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat