गोवा विमानतळ पूर्ववत : 'मिग २९'मधून ड्रॉप टँक कोसळला

    दिनांक  08-Jun-2019पणजी : गोवा विमानतळावर 'मिग २९ के' या लढाऊ विमानाची इंधनाची टाकी कोसळून तिने पेट घेतल्याने गोव्यातील दाभोळी विमानतळ दोन तासांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा वाहतुकीसाठी विमानतळ खुले करण्यात आले आहे.

 

भारतीय हवाई दलाचे 'मिग २९ के' या विमानाची वेगळी होऊ शकणारी इंधनाची टाकी धावपट्टीवर कोसळली. त्यानंतर आग लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दाबोळी विमानतळ काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय भारतीय हवाई दलाकडून घेण्यात आला होता.

 

दाभोळी विमानतळाहून 'मिग २९ के' या लढाऊ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ड्रॉप टँक अर्थात विमानापासून वेगळी होणारी इंधन टाकी कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये 'मिग २९ के' आणि वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगीवर नियंत्रण आणून विमानतळ खुले करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय वायू सेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat