राज्यात सहा हजार चारशे टँकर्सद्वारे पाणीपुरवठा

    दिनांक  07-Jun-2019मुंबई : राज्यात ३ जून २०१९ अखेर एकूण ६ हजार ४४३ टँकर्सद्वारे ५ हजार १२७ गावे आणि १० हजार ८६७ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. राज्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दीर्घ व अल्प स्वरुपाच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

६ हजार ४४३ टँकर्सपैकी औरंगाबाद विभागातील सर्वाधिक २ हजार ३७४ गावे आणि ८०३ वाड्यांना ३ हजार ३५९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर नाशिक विभागात १ हजार ९४ गावे आणि ४ हजार ७९ वाड्यांना १ हजार ४२४ टँकर्स, पुणे विभागात ८७९ गावे आणि ५ हजार १२७ वाड्यांना १ हजार ३५ टँकर्स, अमरावती विभागात ४२१ गावांमध्ये ४४२ टँकर्स, कोकण विभागात ३१६ गावे आणि ८५८ वाड्यांना १३२ टँकर्स आणि नागपूर विभागात ४३ गावांना ५१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

 

टँकरव्दारे पाणी पुरवठा करताना संबंधित गावे-वाड्या-नागरी क्षेत्रातील कायमस्वरुपी अस्तित्वात असलेल्या सध्याच्या लोकसंख्येनुसार दरडोई दरदिवशी ग्रामीण भागासाठी २० लिटर तसेच मोठ्या जनावरांसाठी ३५ लिटर व लहान जनावरांसाठी १० लिटर व शेळ्या मेंढ्यांसाठी ३ लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात उप जिल्हाधिकाऱ्याचा नियंत्रणाखाली टंचाई नियंत्रण व समन्वयासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आल्याचे लोणीकर यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat