ठरलं...पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांतदादा पाटील!

    दिनांक  07-Jun-2019


 


मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव आणि पुण्याच्या पालकमंत्री पदांमध्ये फेरबदल केले आहेत. या नवीन फेरबदलानुसार पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांतदादा पाटील यांची निवड झाली. तर जळगावच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे.

 

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली होती. अखेर आज शासनाने परिपत्रक काढून पुण्याच्या पालकमंत्रीपदावर चंद्रकांतदादा पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले. पुण्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसला शह देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाटील यांची निवड केल्याचे बोलले जात आहे.

 

चंद्रकांतदादा पाटील याआधी जळगांवचे पालकमंत्री होते. मात्र पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याने जळगांव जिल्ह्याच्या पालकमंत्री गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली. महाजन यापूर्वी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat