पतीच्या पगारावर पत्नीचा ३० टक्के हक्क : न्यायालय

    दिनांक  07-Jun-2019


 


नवी दिल्ली : पोटगीच्या रूपात पतीच्या एकूण पगाराचा एक तृतियांश भाग पत्नीला दिला जावा असा निकाल दिल्ली न्यायालयाने दिला आहे. मिळकतीच्या वाटपाचे सूत्र ठरलेले असून या अंतर्गत पतीवर कुटुंबातील आणखी कुणी अवलंबून नसल्यास पतीच्या पगारातील दोन हिस्से पतीकडे राहतील, तर एक हिस्सा पत्नीला पोटगीच्या रुपात द्यावा लागेल, असे न्यायालयाने सांगितले आहे.

 

न्यायालयाने याचिकाकर्त्या महिलेच्या अर्जावर निर्णय देताना पगारातील ३० टक्के भाग पत्नीला देण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबर २००६पासून या केसची प्रक्रिया चालू होती. याचिकाकार्टी महिलेने सीआयएसएफमध्ये निरीक्षक पदावर काम करत असलेल्या मुळाशी लग्न केले. त्यानंतर ५ महिन्यातच ते वेगळे झाले. महिलेने पोटगीसाठी न्यायालयात अर्ज केला. फेब्रुवारी २००८ ला महिलेला पोटगीची रक्कम ठरवली गेली.

 

पतीने आपल्या एकूण पगारातील ३० टक्के भाग पत्नीला द्यावा असे निर्देश न्यायालयाने पतीला दिले. या निर्णयाला महिलेच्या पतीने आव्हान दिले. या नंतर न्यायालयाने पोटगीच्या ३० टक्क्यांच्या रकमेत घट करत ती १५ टक्के केली. त्यानंतर महिलेने या निर्णयाला दिल्ली न्यायालयात आव्हान दिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat