साध्वी प्रज्ञा सिंह यांची न्यायालयात हजेरी

    दिनांक  07-Jun-2019मुंबई : मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयात हजेरी लावली. सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी साध्वी यांच्याकडे स्फोटाबाबत विचारणा केल्यानंतर याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

 

एनआयए न्यायालयाने गेल्या आठवड्यात या प्रकरणाच्या सुनावणीसाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांना आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी (दि. ६) आजारपणामुळे साध्वी यांना न्यायालयात उपस्थित राहता आले नव्हते. मात्र शुक्रवारी त्यांनी न्यायालयात हजेरी लावली.

 

सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी आतापर्यंत साक्षीदारांच्या साक्षीवरून २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये स्फोट झाला होता, असे समोर आले आहे. यावर आपल्याला काही बोलायचे आहे का, असे विचारले. यावर आपल्याला काही माहित नसल्याचे प्रज्ञासिंग ठाकूर यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने आतापर्यंत किती साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आली याची माहिती तुम्हाला तुमच्या वकिलाने दिली का, या प्रश्नावरही प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat