१०वीचा निकाल शनिवारी ८ जूनला होणार जाहीर

    दिनांक  07-Jun-2019


 


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत वेगवेगळ्या अफवा ऐकायला मिळत आहेत. यावर बोर्डाने पूर्णविराम दिला असून दहावीच्या निकालाची तारीख निश्चित केली आहे. येत्या शनिवारी ८ जूनला दुपारी १ वाजता अधिकृत संकेत स्थळावर निकाल पाहता येणार आहे. maharashtraeducation.com, mahresult.nic.in, आणि mahahsscboard.maharashtra.gov.in. या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

 
 
याठिकाणी पाहता येणार निकाल
 
 
 
 
 
 
 
 

गेल्यावर्षीदेखील दहावीचा निकाल हा ८ जूनला जाहीर करण्यात आला होता. मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते २२ मार्चदरम्यान परीक्षा घेण्यात आल्या होत्या. दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते. गेल्या काही आठवड्यांपासून दहावीच्या निकालाबाबत अफवांचा बाजार उठला आहे. सोशल साइट्सवर अनेक वेगवेगळ्या तारखा सांगण्यात येत होत्या. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाले होते. परंतु यावर पडदा टाकत बोर्डाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat