पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका आणि मालदीवच्या दौऱ्यावर जाणार

07 Jun 2019 14:29:27



पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतरचा पहिला भारताबाहेरील दौरा निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका आणि मालदीव
येथे दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

दौऱ्याच्या सुरुवातील ते मालदीवीअन संसदेमध्ये उपस्थितांना संबोधित करणार असून मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह यांची देखील भेट घेणार आहेत त्याचबरोबर अन्य महत्वाच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. त्या आधी मालदीवमध्ये विविध महत्वाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चासत्र होणार आहे. तसेच मालदीवच्या दौऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताने प्रोत्साहित केलेल्या मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण संघटनेने तयार करण्यात आलेल्या उपयुक्त तटीय देखरेखीची प्रणाली तसेच एका प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन देखील करण्यात येईल. 

मालदीवमधील भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेला भेट देतील. श्रीलंकेमध्ये नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेनंतर ऐक्याचे प्रतीक दर्शवण्यासाठी ही भेट घेतली जाईल. श्रीलंकेबरोबर, त्यांच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी तसेच राजनैतिक हितसंबंध वाढवण्याच्या दृष्टीने ही भेट महत्वाची ठरणार आहे. त्यानंतर कोलंबोला भेट देण्यात येईल. नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोलंबोला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले आतंरराष्ट्रीय नेतृत्व आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0