३ वर्षीय बालिकेची अलिगडमध्ये निर्घृण हत्या

    दिनांक  07-Jun-2019अलिगडमध्येत्तर प्रदेशमधील  एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका तीन वर्षांच्या चिमुरडीची १० हजार रुपयांचे कर्ज न चुकवल्याने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ट्विंकल शर्मा असे या मुलीचे नाव असून या हत्येप्रकरणी पोलिसांनी आज टप्पल येथील रहिवासी जाहीद आणि असलम या दोघांना अटक केली. त्यानंतर चौकशीदरम्यान ट्विंकल शर्माची हत्या केल्याचे कारण त्यांनी पोलिसांना कबूल केले.

 

३१ मे रोजी ट्विंकल बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ट्विंकलचा शोध घेण्यास सुरुवात केली. २ जूनला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ट्विंकलचा मृतदेह आढळून आला. अत्यंत निर्घृण आणि निर्दयीपणे ट्विंकलची हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी जाहीद आणि असलम ला अटक केली. या दोघांवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर या घटनेविषयी काही अफवा पसरवल्या जात होत्या. त्यावर स्वत: अलीगडचे पोलीस निरीक्षक आकाश कुलहरी यांनी स्पष्टीकरण दिले. ट्विंकलवर बलात्कार झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे समोर आले.

ही बातमी समोर येताच सर्व क्षेत्रातील लोकांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाच्या निषेधाप्रीत्यर्थ सोशल मीडियावर एक हॅशटॅग देखील फिरत आहे.

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat