जैवविविधता संवर्धनासाठी ठाणे मनपाचा पुढाकार

    दिनांक  06-Jun-2019ठाणे : शहरातील जैवविविधतेचा ठेवा जतन करावा, तसेच त्यांचे चांगल्याप्रकारे संवर्धन करण्यासाठी आवश्यक त्या शास्त्रोक्त पद्धतीने उपाययोजना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका पुढाकार घेणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी घेतला.

 

गुरुवारी राज्य वन संरक्षण समितीचे सदस्य व दै.'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार यांच्यासह प्रदीप पातार्डे, भाऊ काटदरे, डॉ. दिनेश विनेरकर, निकीत सुर्वे आदींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीत प्रामुख्याने ठाणे शहरात असलेल्या जैवविविधतेची माहिती घेणे, त्या माहितीची व्यवस्थित मांडणी करणे आणि त्यानंतर त्यांचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा ठेवा कसा वृद्धिंगत करता येईल, याबाबत कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर जयस्वाल यांनी जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी या सर्व तज्ज्ञांना कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येऊ शकतात, याचा अहवाल सादर करण्यास सांगितले. तो अहवाल प्राप्त होताच त्यानंतरची कार्यवाही निश्चित करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat