पंजाब काँग्रेसमध्ये सिद्धूची बंडखोरी

    दिनांक  06-Jun-2019 


चंदीगड : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादांना तोंड फुटले असल्याचेच चित्र दिसत आहे. काँग्रेस पंजाबमधील दोन महत्वाच्या व्यक्तींचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धू यांच्यातील वाद पुन्हा समोर आला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीला सिद्धू गैरहजर राहिले.

 

आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. लोकसभा निवडणुकांनंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची पहिली कॅबिनेट बैठक घेतली होती. या बैठकीला सिद्धू हजर राहिले नाहीत. सिद्धू सांगितले की, "काँग्रेसच्या अपयशासाठी मला एकट्याला जबाबदार धरले जात आहे, हे योग्य नव्हे. अपयशाची जबाबदारी सामुहिक आहे. मग माझ्या एकट्याविरोधात कारवाई का?"

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat