मुंबई पोलीस हायअलर्टवर ; दहशतवादी कारवाईची शक्यता

    दिनांक  06-Jun-2019मुंबई : सध्या मुंबईमध्ये हाय अलर्टचे वातावरण पसरले आहे. सध्या घडलेल्या दोन घटनांमुळे मुंबईमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील उरणमध्ये आयएसआयएसशी निगडित संदेश लिहिलेला मुंबई पोलिसांना सापडला. त्यानंतर कुर्ला यार्डमध्ये शालीमार एक्स्प्रेसमध्ये ५ जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. या सर्व घटनांमुळे मुंबई पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर गेल्याचे समजते.

 

मुंबई पोलीस दलाने मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानक आणि पोलीस ठाण्यांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दहशतवादी घटना घडू नयेत म्हणून मुंबईतील सीएसटीएम स्थानकावर तपासणी पथक वाढवण्यात आले आहे. दरम्यान शहरातील सर्वच रेल्वे स्थानकांवर तपासणी वाढवण्यात आली आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. प्रवाशांच्या बॅग चेक केल्या जात आहेत तसेच गरज वाटली तर चौकशी देखील केली जात आहे. सीएसटीएम हे मुंबईतील सर्वात वर्दळीचे एक स्थानक असल्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat