शालिमार एक्सप्रेसमध्ये आढळल्या जिलेटीनच्या कांड्या

    दिनांक  05-Jun-2019मुंबई : मुंबईमध्ये शालिमार एक्सप्रेसमध्ये ५ जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील कारशेडमध्ये ट्रेन गेली असता हा प्रकार उघडकीस आला. जिलेटीनच्या कांड्यासोबत वायर, बॅटरीदेखील आढळून आल्या. या वस्तूंसह एक पत्र आढळून आले असून पत्रात भाजप सरकारविरोधी मजकूर आढळला आहे.

 

घटनेनंतर आरपीएफ, जीआरपीएफची, बॉम्बशोधक पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण स्टेशन परिसर रिकामा करण्यात आला होता. बुधवारी सकाळी ९.३०च्या सुमारास शालिमार एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस कारशेडमध्ये दाखल झाली होती. त्यानंतर सफाईदरम्यान कर्मचाऱ्यांना काही संशयास्पद वस्तू एका डब्यात आढळल्या. सफाई कर्मचाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा यंत्रणेला याबाबत माहिती दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat