'नीट'चा निकाल जाहीर

    दिनांक  05-Jun-2019मुंबई : एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या (एनटीए) वतीने गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात नलिन खंडेलवाल देशात पहिला आला असून मुलींमध्ये तेलंगणची माधुरी रेड्डी पहिली आली आहे.

 

नलिन खंडेलवालने ७२० पैकी ७०१ गुण मिळवले आहेत. महाराष्ट्राच्या सार्थक भटने ७२० पैकी ६९५ गुण मिळवत राज्यात पहिला, तर देशात सहावा येण्याचा मान मिळवला आहे. पहिल्या ५० टॉपरमध्ये राज्यातील तिघांचा समावेश आहे.

 

सार्थक भट, साईराज माने, सिद्धांत दाते या महाराष्ट्रातील तिघांचा देशातल्या टॉप ५० मध्ये नंबर लागतो. १४ लाख १० हजार परीक्षार्थींपैकी ७ लाख ९७ हजार ४२जण नीट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत १०७ ते ७०१ या श्रेणीत विद्यार्थ्यांचे गुण आहेत. महाराष्ट्रातून सर्वाधिक २ लाख ६ हजार ७४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ८१ हजार १७१ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat