रो'हिट'च्या शतकाने पहिल्या विजयाची 'चहल'

    दिनांक  05-Jun-2019साऊथहॅम्प्टन : आयसीसी विश्वचषक २०१९मध्ये भारताने पहिल्याच सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेवर ६ विकेटने दणदणीत विजय मिळवू आनंद साजरा केला. इंगलंडमधील मिनी पंजाब मानल्या जाणाऱ्या 'साऊथहॅम्प्टन'च्या द रोझ बाऊल मैदानावर हा सामना झाला. रो'हिट'मॅन शर्माच्या फलंदाजीची जादू आणि भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीने दक्षिण आफ्रिकेची मात्र दैना केली. भारताने हा सामना ६ विकेटने जिंकला .रोहितने १२२ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

 

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २२८ धावांचे लक्ष ठेवले. भारताकडून फिरकीपटू यजुर्वेंद चहलच्या फिरकीसमोर द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली. त्याने सर्वाधिक ४ मोहरे टिपले. तर, बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन बळी मिळविले. तसेच, कुलदीप यादवने एक बळी घेतला.

 

२२९ धावांचे माफक आव्हान गाठण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ८ धाव करून बाद झाला तर कर्णधार विराट कोहली १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने लोकेश राहुलच्या साथीने ८५ धावांची भागीदारी करून विजय जवळ आणला. महेंद्र सिंग धोनीने ३४ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. अखेर हार्दिक पंड्याने ३ चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केले. 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat