येत्या ३ वर्षात भारताचा विकासदर ७.५ टक्के राहील ; जागतिक बँक

    दिनांक  05-Jun-2019


 


नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यव्यस्थेबाबत जागतिक बँकेने चांगली बातमी दिली आहे. भारताचा विकासदर येत्या तीन वर्षांत ७.५ टक्के राहिल, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तविला आहे. तसेच, भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पहिले स्थान कायम ठेवेल, असा विश्वासही जागतिक बँकेने अहवालात व्यक्त केला आहे.

 

जागतिक बँकेने 'ग्लोबल आर्थिक प्रॉस्पेक्ट' मंगळवारी प्रसिद्ध केला. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर हा ७.२ टक्के होईल, असा अंदाज बँकेने वर्तविला. चांगली गुंतवणूक आणि दैंनदिन वस्तू खरेदीसह सेवांचा वापर यामुळे अर्थव्यवस्थेला मदत होईल, असे बँकेने सांगितले आहे.

 

चीनचा २०१८ मध्ये विकासदर हा ६.६ टक्के राहिला आहे. चालू आर्थिक वर्षात २०१९ मध्ये विकासदर हा ६.२ टक्के राहिल, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तविला आहे. त्यानंतर २०२० मध्ये ६.१ टक्के तर २०२१ मध्ये ६ टक्के विकासदर होईल असा अंदाज बँकेने व्यक्त केला आहे. २०२१ मध्ये भारताचा विकासदर हा चीनहून १.५ टक्के जास्त असेल, असेही जागतिक बँकेने सांगितले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat