माधव व दिगंबर फिटनेससाठी एकत्र

    दिनांक  05-Jun-2019
मुंबई : 'बिग बॉस मराठी सीजन २'चा पहिला आठवडा घरातील सर्व मंडळींसाठी खूपच चांगला ठरला. कारण या आठवड्यामध्‍ये कोणतेच एलिमिनेशन झाले नाही. पण दुस-या आठवड्यामध्‍ये प्रवेश करत असताना घरामध्‍ये सर्व ताणतणावादरम्‍यान मैत्री बहरताना दिसत आहे. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या या क्लिपमध्‍ये माधव दिगंबरला फिटनेसबाबत काही टिप्‍स देताना दिसत आहे.

 
व्‍यायामशाळेमध्‍ये व्‍यायाम करत असताना दिगंबर त्‍याच्‍या वाढत्‍या पोटाबाबत चिंतित असल्‍याचे वाटते. तो परागने त्‍याला सुचवलेल्‍या चुर्णाबाबत सांगतो. माधव मध्‍येच येतो अणि म्‍हणतो, ''आपल्‍याला पोटातील गॅस कमी करायची आहे. तुम्‍ही श्‍वास घेतला की पोट फुगत असेल तुमचा आणि आपला बिल्‍डर आहे जो त्‍याने श्‍वास घेतला की त्‍याचा पोट आत जातं, ते सवयीप्रमाणे बदलता येते. प्‍लँक केलं ना तुम्‍ही की जातं आत पोट.''
 

दिंगबर माधवचे म्‍हणणे मान्‍य करतो आणि बोलतो, ''पर्सनल ट्रेनर आहे माझा, त्‍याने डाएट दिलेला मला आणि ते फॉलो करून १७-१८ किग्रॅ वजन कमी केलेलं मी.'' माधव त्‍याला आहाराची माहिती सांगायला सांगतो आणि म्‍हणतो, ''मी १४ किलो वजन कमी केलयं इथे येण्‍याच्‍या आधी. हळूहळू केलं कमी, ४ महिने लागले मला, पटकन नाही केलं मी नाही तर पटकन वाढतं पण.'' खरंतर, माधव व परागने दिंगबरला दिलेल्‍या सर्व टीप्‍ससह दिगंबर त्‍याचे पोट कमी करण्‍याची आपण केवळ आशा करू शकतो. घरातील अनसीन फूटेज पाहण्‍यासाठी पाहत राहा 'बिग बॉस अनसीन अनदेखा' फक्‍त वूटवर!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat