उरणमधील पुलावर दहशतवाद्याशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर

    दिनांक  04-Jun-2019उरण : उरण तालुक्यातील खोपटा पुलाच्या खांबावर लिहिलेल्या दहशतवाद्यांशी संबंधित आक्षेपार्ह मजकुरांमुळे या भागात खळबळ उडाली आहे. उरण तालुक्यातील पूर्व विभागाला जोडणाऱ्या खोपटा पुलाच्या खांबावर आतंक का आका अब्बू बकर अल् बगदादा’, ‘दुनिया और दो जहाँ का खुँखार आतंकवादी अब्बू बकर बगदादी’, ‘आयएसआय इस्लामिक स्टेट के लडके सबसे तेजअशी आक्षेपार्ह वाक्ये लिहिली असल्याचे आढळून आले. त्याच्या बाजूलाच एक नकाशा आखला असून त्यावर विविध आकडे आणि शब्दांचा उल्लेख करण्यात आला आहे.

 

उरण तालुक्यात ओएनजीसी, नौदलाचे शस्त्रागार, जेएनपीटी, विद्युत केंद्र या सारखेसंवेदनशील व महत्वाचे प्रकल्प असल्याने या संदेशाला महत्व प्राप्त झाले आहे. उरण पोलिसांना या बाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याबाबतचा तपास सुरू केला आहे. हस्ताक्षरावरून हा मजकूर कोणी स्थानिकांनी लिहिला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ज्या ठिकाणी हे संदेश लिहिले आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बियरच्या बाटल्या देखील आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat