केरळमध्ये निपाह व्हायरस बाधित रुग्ण आढळला

    दिनांक  04-Jun-2019तिरुवनंतपुरम : केरळमध्ये घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा निपाह विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. केरळमध्ये निपाह विषाणूची बाधा झालेला रुग्ण आढळला असून सुमारे ८६ जणांना आरोग्य विभागाने देखरेखीखाली ठेवले आहे. या सर्व रुग्णांना निपाह विषाणूची बाधा झाल्याचा संशय असून वैद्यकीय अहवालानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

 

निपाह बाधित रुग्णाची प्रकृती गंभीर नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. नागरिकांबरोबरच रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निपाह विषाणूबाबत जनजागृती करण्यासाठी माध्यमांनीही पुढाकार घ्यावा तसेच सोशल मीडियावरील अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही विभागाने म्हटले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat