आजचा पर्यावरण दिन ठाण्यात!

    दिनांक  04-Jun-2019
दै. मुंबई तरुण भारतकडून तीन दिवसीय भव्य महोत्सवाचे आयोजन


ठाणे : पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासंबंधीच्या प्रबोधनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून दै. मुंबई तरुण भारतने ग्रीन आयडिया २०१९या भव्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. ठाण्याच्या जांभळी नाका परिसरातील शिवाजी मैदानामध्ये दि. ५, , ७ जून रोजी हा महोत्सव पार पडेल. महाराष्ट्रात पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असणार्या आघाडीच्या संस्थांचे प्रदर्शन आणि वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संशोधकांशी संवादाचा कार्यक्रम हे या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. तीन दिवसीय या महोत्सवातील विविध कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य असून हा महोत्सव सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांकरिता खुला असेल.

 

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दरवर्षी दै. मुंबई तरुण भारत’ ‘ग्रीन आयडियाया कार्यक्रमाचे आयोजन करते. यंदा हा भव्य महोत्सव ठाण्याच्या शिवाजी मैदानामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा ५ जून रोजी सकाळी ९ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष सुश्रुत चितळे, ‘ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, ‘एसएफसी इन्व्हायर्नमेंटल प्रा.लि.चे संचालक संदीप आसोलकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमामध्ये वन्यजीव संशोधन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावणार्या निकीत सुर्वे, प्रदीप पाताडे, मोहन उपाध्ये, डॉ. दिनेश विन्हेरकर, भाऊ काटदरे आणि श्रीपाद अष्टीकर यांना ग्रीन अॅव्हेंजर्सपुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शिवाय या संशोधकांच्या संशोधनाला सहकार्य म्हणून ५० हजार रुपयांचा सहयोग निधी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणार्या या महोत्सवात महाराष्ट्रातील ५० हून अधिक पर्यावरणवादी संस्था उपस्थित राहणार आहेत. तर महाराष्ट्र वनविभाग, कांदळवन संरक्षण विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात येणार आहे.

 

विविध संस्थांच्या प्रदर्शनाशिवाय वन्यजीव संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे तज्ज्ञ संशोधक आपले अनुभव सांगून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता निकीत सुर्वे हा तरुण संशोधक बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यावरील संशोधनाचा उलगडा करणार आहे. यानंतर ७ वाजता सिमेंटच्या जंगलाला हिरवे कोंबया सत्राअंतर्गत संजीव धामणसे प्रेक्षकांशी ग्रीन बिल्डिंगया विषयासंदर्भात संवाद साधतील. त्यापुढे ८ वाजता कांदळवन संरक्षण विभागातील डॉ. शीतल पाचपांडे आणि सुनील बाकोडे हे तज्ज्ञ कांदळवनांचे महत्त्व आणि त्यातील रोजगारनिर्मितीच्या संधी याबद्दल माहिती देतील.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat