दुष्काळग्रस्तांसाठी जनकल्याण समितीचा पुढाकार

    दिनांक  04-Jun-2019दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे केले आवाहन


मुंबई : महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी रा. स्व. संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) नेहमीप्रमाणे सरसावली असून पाणीपुरवठा, चारावाटप, पशुखाद्यवाटप, जलसंधारणाची कामे व विद्यार्थ्यांना आहार वाटप करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. १५ जिल्ह्यातील २८ हजार ५२३ गावांमध्ये यंदा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या ठिकाणी दुष्काळाची परिस्थीती गंभीर झाल्याने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

वाड्या-वस्त्या आणि छोट्या गावांमध्ये टँकरने शुद्ध पाणीपुरवठा करणे, दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांचे वाटप करणे, पशुधनासाठी निवारा, चारा पुरवठा व वैद्यकीय मदत, पारंपारिक विहिरी, बंधारे या जलस्त्रोतांची सफाई, छोट्या शेतकर्‍यांसाठी अवजारे, बी-बियाणे व खतांची मदत, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि परीक्षेच्या ठिकाणी भोजन व्यवस्था आदी कामांना जनकल्याण समितीने सुरुवात केली आहे. पशुखाद्याचा दिवसाचा खर्च १३० रुपये, पाण्याचा एक टँकर २५०० रुपये, पाणी साठवण टाकीसाठी खर्च प्रत्येकी एक लीटरकरिता ६ रुपये, प्रत्येकी विद्यार्थ्याचा एक दिवसाचा भोजन खर्च १०० रुपये इतका असल्याने समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी या कार्यासाठी मदत करावी, असे आवाहन जनकल्याण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी ज्यांना आथिर्क मदत द्यावयची असेल त्यांनी दक्षिण मुंबईसाठी प्रताप परब - ९८२०७३५८०१, पूर्व उपनगरासाठी सुहास बांदेकर - ९८२०३८२६७७, पश्चिम उपनगरासाठी अंकुश बेटकर - ९५६१२१६७७२, पश्चिमोत्तर उपनगरासाठी अरविंद शिंदे - ७२०८३१५०४५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय 'RSS Jankalyan Samiti' नावाने तुम्ही धनादेश काढू शकता. तसेच ऑनलाईन ट्रान्सफर करण्याची सुविधा समितीने दिली आहे. खाते क्रमांक - ६०१८३९९१५८३ आयएफएससी क्रमांक - MAHB००००२९९ यावर तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर किंवा आरटीजीएस करू शकता. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर ९८२१०२४१३३ या क्रमांकावर आरटीजीएस क्रमांक किंवा ट्रान्सक्शन क्रमांक, नाव, पत्ता, पॅन नंबर आणि संपर्क क्रमांक व्हाट्सअप किंवा मेसेज करण्याचे आवाहन समितीने केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat