रेणुका शहाणे १० वर्षांनी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार

04 Jun 2019 15:45:27

 

'हम आपके है कौन' या चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने प्रभावित केल्यानंतर अभिनेत्री रेणुका शहाणे हिने 'रिटा' नावाच्या एका चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर आता तब्बल १० वर्षांनी ती पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे. 'त्रिभंग' असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये चित्रपट सृष्टीतील अतिशय लोकप्रिय तीन अभिनेत्री काम करणार आहेत.

 

मिथिला पालकर, शबाना आझमी आणि आता काजोल देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट स्त्रीशक्तीवर आधारलेला असल्यामुळे अशा कणखर स्त्रियांची निवड चित्रपटासाठी करण्यात आली आहे.

 

तीनही अभिनेत्रींना चित्रपटाची कथा भावली असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होईल आणि पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या चित्रपटातील कलाकारांबरोबरच दिग्दर्शनाकडे देखील प्रेक्षकांचे बारकाईने लक्ष राहणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0